मान्यवरांच्या नजरेतून माधवराव गडकरी

गडकऱ्यांचा आणि मराठी वाचकांचा संवाद जमला कारण त्यांचा मनःपिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्याच्याशी कृतज्ञ राहून , इमान ठेवून गडकरींनी लिहिले.

- पु.ल. देशपांडे

 

आचार्य अत्रेंनंतर  मराठी माणसावर जीवापाड प्रेम करणारा आणि त्यांना संघटित करून लढणारा  लेखक पत्रकारम्हणून गडकरींचे स्थान खूपच मोठे होते.


 - रामदास फुटाणे

 

माधव गडकरींनी अर्धशतकाहून अधिक काळ लोकशिक्षण  आणि जनजागृतीचेकाम 'मुंबई सकाळ ' आणि लोकसत्ता या दैनिकातून केले .जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेले कामवृत्तपत्र व्यवसायातील अनेकांना प्रेरणा व मार्गदर्शन देणारे आहे.

- शरद पवार

 

समाजाची दुःखे आपल्यासोबत घेऊन त्यांनी आपली लेखणी चालवलीअन्यायाविरुद्ध लढण्याचे शस्त्र त्यांनी सतत आपल्याजवळ बाळगले.

- सुशीलकुमार शिंदे

 

विविध दैनिकांमधून संपादकांची भूमिकायशस्वीरीत्या पार पडत असताना गडकरी यांनी आपल्या चौफेरदृष्टीमुळे पत्रकारितेला एक नवा आयाम मिळवून दिला.

- नितीन गडकरी

 

माधव गडकरींचं वैशिष्ट्य म्हणजे ते हातात असलेल्या वृत्तपत्राचेआंदोलन बनवत असत.एखाद्या वृत्तपत्राचे infrastructure  हे त्यांचे बलस्थान ना बनता माधव गडकरींचे लेखन हे त्या वृत्तपत्राचे बलस्थान बनत असे.


 - राजू परुळेकर

 

 


 
© www.madhavgadkari.com
Developed By Maitraee Graphics